“मराठी भाषा गौरव दिन २०२६”

आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे श्रीमती हिराबेन नानावटी इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट अँड रिसर्च फॉर वूमन येथे मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी २०२६ ला साजरा करण्यात आला.या अंतर्गत विद्यार्थिनींसाठी मराठी पुस्तक परीक्षणाची स्पर्धा घेण्यात आली. दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ ला झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विजेत्या विद्यार्थिनींचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.कुसुमाग्रजांच्या काही निवडक कवितांचा डिस्प्ले ग्रंथालयात करण्यात आला. ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांनी कवितांचा आस्वाद घेतला. सर्व विद्यार्थिनींना, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कुसुमाग्रजांची काही निवडक कवितांची ई-लिंक पाठविण्यात अIली आणि वाचण्याकरिता प्रेरणा देण्यात अIली.

मराठी भाषेविषयी रुची वाढावी यासाठी निवडक मराठी पुस्तकांचा डिस्प्ले करण्यात आला. बऱ्याच विद्यार्थिनींनी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मराठी साहित्याची पुस्तके ग्रंथालयातून वाचण्यासाठी घेतली.

संचालिका डॉ. प्रियंका सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल मंजुश्री नवले, मीनल कोतवाल, सुशीला फाले आणि विद्यार्थिनींनी उपक्रमासाठी सहकार्य केले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *