महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे श्रीमती हिराबेन नानावटी इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट अँड रिसर्च फॉर वूमन येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. (१४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२६). या अंतर्गत मराठीतील काही निवडक कवितांचा डिस्प्ले ग्रंथालयात करण्यात आला. ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांनी कवितांचा आस्वाद घेतला.
जो विद्यार्थी अधिकाधिक पुस्तके वाचतो तो अधिकाधिक समृद्ध आणि ज्ञानी होतो. त्यामुळे सर्व विद्यार्थिनींनी ग्रंथालयाशी मैत्री करून जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत, मराठी आणि वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने सर्व विद्यार्थिनींना व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मराठी साहित्यांची ई-लिंक पाठविण्यात अIली आणि पुस्तके वाचण्याकरिता प्रेरणा देण्यात अIली, यामुळे फ्री e -बुक्स पण सर्वांना डाउनलोड करता येतील. कोणी कोणते पुस्तक वाचले /डाउनलोड केले ह्या साठी त्यांना गुगल फॉर्मची लिंक पाठविण्यात आली व तो फॉर्म भरावयास सांगितला .
निवडक मराठी पुस्तकांचा डिस्प्ले करण्यात आला. बऱ्याच विद्यार्थिनींनी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मराठी साहित्याची पुस्तके ग्रंथालयातून वाचण्यासाठी घेतली.
मराठी वाचन कट्टा २०२६ ची निर्मिती करण्यात आली. त्याद्वारे मराठी साहित्याची माहिती वाचकांना पुरवायला सुरुवात झाली.संचालिका डॉ. प्रियंका सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल मंजुश्री नवले, मीनल कोतवाल आणि विद्यार्थिनींनी उपक्रमासाठी सहकार्य केले.
फोटो : विद्यार्थिनीं, अध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथालयातून मराठी साहित्य घेताना


वाचक ग्रंथालयात प्रदर्शनीय मांडलेली मराठी पुस्तके पाहताना

